Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असणारा अवकाळी पाऊस काशी अंशी काढता पाय घेताना दिसत आहे. असं असलं तरीही राज्यातील काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. सध्याच्या गडीला हवामानात झालेले बदल पाहता राज्यातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किंबहुना राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 38 अंशांच्या वर गेलं असून उष्णतेचा दाह आता अडचणी वाढवताना दिसत आहे. इथं ठाण्यातील मुरबाडमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्यामुळं आरोग्य विभाग आणि हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. (maharashtra weather Unseasonal Rain heat wave know all india Weather Forecast latest update )

पुढचे दिवस उष्णतेचे…
पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंगदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ज्यामुळं पुणे नजीकच्या भागातील तापमान 40 अंशांवर पोहोचू शकतं. त्यातच चंद्रपुरात तापमानाचा आकडा 43.6 अंशांवर पोहोचल्यामुळं उष्णतेची तीव्रता लक्षात येत आहे. पुढील काही दिवस चंद्रपुरात अशीच परिस्थिती राहील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, तिथे वाशिमचं तापमानही 42 अंशावर पोहोचलं आहे, तर परभणीचा पारा 41 अंशांपर्यंत गेला आहे. तापमानाचे हे आकडे पाहता सध्या रादज्यात सकाळच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची गर्दीही कमी दिसू लागली आहे.

आरोग्याची काळजी घ्या

तापमानाचा सातत्यानं वाढणारा पारा आणि मधूनच येणारी अवकाळीची सर पाहता नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सकाळी 11 ते दुपारी 3/4 या वेळेत घराबाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सध्या सूती कपडे, टोपी, गमछा, रुमाल, छत्र्यांचा वापर होताना दिसत आहे. त्यातच उष्माघाताचा धोका पाहता राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना काही प्राथमिक उपाय योजण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. चहा, कॉफी, शीतपेय टाळा, लिंबू सरबत, नारळ पाणी, माठातील पाणी पिण्याला प्राधान्य द्या असा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *