फॉर्म 16 शिवायही भरला जाऊ शकतो ITR? कोणाला असते या फॉर्मची गरज? जाणून घ्या नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ एप्रिल । आर्थिक वर्ष 2023-24 सुरू झाले आहे. अशा वेळी आता प्रत्येक करदात्याला आपला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर फाइल करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर इन्कम प्रूफ असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन आणि आधार लिंक असणे आवश्यक असतं. तुमचा ई-मेल आयडी देखील आयकर डिपार्टमेंटजवळ रजिस्टर्ड असायला हवा. परंतु, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही प्रकरणांमध्ये पगारदार व्यक्ती फॉर्म 16 शिवाय देखील ITR दाखल करू शकते.

फॉर्म 16 हे असे डॉक्यूमेंट आहे ज्याद्वारे कर्मचाऱ्याला संपूर्ण टॅक्सेबल उत्पन्नाचा हिशोब मिळतो. काही कर्मचाऱ्यांचे वेतन आयकराच्या कक्षेत येत नाही. अशा परिस्थितीत कंपनी त्यांच्यासाठी फॉर्म 16 जारी करत नाही. अशा वेळी, जर त्या कर्मचाऱ्यांना ITR भरायचा असेल तर ते फॉर्म 16 शिवाय देखील करू शकतात.

फॉर्म 16 म्हणजे नेमकं काय?
इन्कम टॅक्स भरण्यासाठी फॉर्म 16 हा एक महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. या डॉक्यूमेंटमध्ये, व्यक्तीच्या संपूर्ण उत्पन्नाचा लेखाजोखा लिहिलेला असतो. यावरून त्या व्यक्तीने एकूण किती पैसे खर्च केले हे कळते. यासोबतच किती टॅक्स कापला आहे हे देखील कळते. आर्थिक वर्षात कापलेल्या टीडीएसची माहितीही मिळते. यासोबतच गुंतवणुकीचीही माहिती देखील मिळते. इन्कम टॅक्स नियमांनुसार, कंपनीने कर्मचाऱ्याच्या पगारातून टीडीएस कापला तर त्याला टीडीएस सर्टिफिकेट जारी करणं आवश्यक आहे.

फॉर्म 26AS पडेल उपयोगात
तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल तर तुम्ही फॉर्म 26AS च्या मदतीने सहजपणे ITR दाखल करू शकता. फॉर्म 26AS मध्ये TDS आणि TCS विषयी माहिती आहे. यासोबतच त्या व्यक्तीचा अॅडव्हान्स टॅक्स आणि उच्च मूल्याच्या व्यवहारांचे डिटेल्सही असतात. यामध्ये दिलेल्या डिटेल्ससह तुमची सॅलरी स्लिप, एचआरए स्लिप, आयकर कलम 80C आणि 80D अंतर्गत केलेल्या गुंतवणुकीचा पुरावा देखील आवश्यक असेल. तुम्ही होम लोन घेतलं असेल तर त्याचा पुरावा देखील ITR भरताना द्यावा लागतो. या सर्वांच्या मदतीने तुम्ही फॉर्म 16 शिवायही आयकर रिटर्न भरू शकता.

 

असा डाउनलोड करा फॉर्म 26AS
-तुम्ही सॅलरी इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नसेल मात्र तुम्हाला आयटीआर दाखल करायचा आहे तर तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवरुन 26AS फॉर्म डाउनलोड करु शकता.

-ई-फाइल पोर्ट https://www.incometax.gov.in/iec/foportal/ वर जा.

-येथे My Account पर्याय दिसेल. यामध्ये व्ह्यू फॉर्म 26AS लिंकवर क्लिक करा.

-यानंतर यामध्ये असेसमेंट वर्ष निवडा आणि व्ह्यू टाइमवर क्लिक करा.

-यानंतर डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा. फॉर्म डाउनलोड होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *