महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । जगाची निर्मिती व त्यातील निसर्गाचा अविष्कार हे माणसाच्या विचारापलीकडचे विषय आहेत. तुम्हीच बघा ना, कोट्यवधी लोकांना जमिनीवर घर देताना आभाळाचं छप्पर देताना निसर्गाने किती कलाकुसर दाखवली आहे. एवढंच नाही तर तितकंच सुंदर आणि भव्य विश्व जमिनीशिवाय पाण्यातही निर्माण केलंय. समुद्रीजगाविषयी आपल्याला नेहमीच कुतूहल असते, समुद्री जीवांमध्ये सर्वात हुशार व भीतीदायक मानला जातो तो शार्क मासा. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शार्क माशाच्या शरीरातील कधीही न पाहिलेले दृश्य बघता येऊ शकते.
@Zimydakid या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या मूळ व्हिडिओमध्ये शार्क माशाच्या शरीरातील अवयव कॅमेराने टिपले आहेत. आता हे शक्य कसं झालं? तर, Zimy Da Kid या नावाच्या चित्रपट दिग्दर्शकाची डीप सी डायव्हिंग दरम्यान शार्कशी भेट झाली. यावेळी शार्कने अनावधानाने दिग्दर्शकाच्या हातातील कॅमेरा खेचून गिळला. काही मिनिटातच शार्कने हा कॅमेरा पुन्हा शरीरातून बाहेर फेकला पण त्याआधी कॅमेरा सुरु असल्याने शार्कच्या जबड्यातील, छातीतील काही भाग कॅमेरामध्ये कैद झाले आहेत.
https://www.instagram.com/zimydakid/?utm_source=ig_embed&ig_rid=92f4c8f2-5ca2-4d88-b066-38a459ce2db4
दरम्यान हा व्हिडीओ अनेक पेजेसवरून व्हायरल झाला आहे. मूळ व्हिडिओला आतापर्यंत मिलियन व्ह्यूज आहेत तर अन्य पेजेसवर सुद्धा नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडत आहे. अनेकांनी कमेंट करून या दिग्दर्शकाच्या हिमंतीचे सुद्धा कौतुक केले आहे. तर काहींनी आता शार्कने त्याचा पहिला व्हिडीओ बनवला आहे आता तो युट्युब चॅनेल सुरु करेल अशा मजेशीर कमेंट केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.