DC vs KKR Playing 11 : नितीश राणा की वॉर्नर कोण मारणार बाजी? प्लेईंग 11 आणि खेळपट्टीबद्दल जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । आयपीएल (IPL 2023) आज, 20 एप्रिलला दोन सामने खेळवले जाणार आहे. दुसरा सामना कोलकाता (KKR) आणि दिल्ली (DC) यांच्या पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) यंदाच्या आयपीएलच्या 16 व्या हंगामामधील त्यांच्या पहिल्या विजयाचा प्रतिक्षेत कायम आहे. आज, 20 एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स पहिला विजय मिळवण्यासाठी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध मैदानात उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलग पाच सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ आज पहिला विजय मिळवून खातं उघडण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीच्या विरोधात उतरणारा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Kinght Riders) मागील सामन्यांमधील सलग दोन पराभवानंतर आज विजयी मार्गावर परतण्यासाठी सज्ज आहेत. दोन सामन्यांमधील पराभवानंतर कर्णधार नितीश राणाच्या नेतृत्त्वात केकेआर संघ आजच्या सामन्यात विजयाच्या शोधात उतरणार आहे.


अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium, Delhi) मैदानावर अनेक मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स संभाव्य प्लेईंग 11
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, मनीष पांडे, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान, खलील अहमद.

KKR Probable Playing 11 : कोलकाता नाइट रायडर्स संभाव्य प्लेईंग 11
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), एन जगदीशन, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकु सिंह, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *