महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । पुण्यात आज उन्हाचा कडाका वाढताना दिसतोय. पुणे शहराचं तापमान आज 39 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. काल देखील पुण्यात कमाल तापमानाची नोंद झाल आहे. काल मध्यवर्ती पुण्यात 40 अंश सेल्सिअस डिग्रीच्यावर तापमान पाहायला मिळालं. तर पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये सर्वात जास्त 42 अंश डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात विचार करता तळेगाव ढमढेरेमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर वाढत्या तापमानामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झालीये. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उपचारांची दिशा, औषधांची उपलब्धता, याबाबत शासनातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकार्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.