IPL 2023, CSK Vs SRH: बेन स्टोक्स सज्ज, सीएसके उत्साहात! आज सनरायझर्सविरुद्ध लढत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । चेन्नई – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज शुक्रवारी घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळेल. या सामन्याआधी स्टार अष्टपैलू बेन स्टोक्स फिट झाल्यामुळे त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील. पायाच्या दुखण्यामुळे तो तीन सामने खेळला नव्हता. मागच्या सामन्यात सीएसकेने आरसीबीवर विजय नोंदविला होता. दुसरीकडे, एडेन मार्करामच्या सनरायजर्सचा मुंबईकडून पराभव झाला.

चेन्नई सुपरकिंग्ज
 डेवॉन कॉन्वे-ऋतुराज यांची भक्कम सलामी जोडी, शिवम दुबेची आक्रमक फटकेबाजी, बेन स्टोक्सचे पुनरागमन ही जमेची बाजू.
 अजिंक्य रहाणेची तुफानी फटकेबाजी पण मधल्या फळीकडून धावांची अपेक्षा राहील.
 तुषार देशपांडे सामन्यागणिक सुधारतोय. त्याच वेळी महेश तीक्ष्णा, रवींद्र जडेजा, मोईन अली या फिरकी त्रिकुटाकडून मोठ्या आशा.

सनरायजर्स हैदराबाद
 फलंदाजांनी अखेरपर्यंत स्थिरावण्याची गरज. मधल्या फळीकडून उपयुक्त योगदानाची गरज. हॅरी ब्रुकवर विसंबून राहणे चूक ठरेल.
 गोलंदाजीत सातत्याचा अभाव. दिग्गज गोलंदाज असूनही सांघिक योगदानात अपयशी ठरले.
 वॉशिंग्टन सुंदरचे हे स्थानिक मैदान. सीएसकेविरुद्ध तो विशेष कामगिरीद्वारे विजयात योगदान देऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *