Sun Stroke Symptoms : उष्मघात; ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा ; करा हे उपाय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । Sun Stroke : सध्या उन्हाळा सुरू झालाय. सगळीकडे तापमान वाढलंय. उन्हापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण वाट्टेल तरे प्रयत्न करतोय मात्र मागील काही दिवसांपासून उष्मघाताचे अनेक रूग्ण आढळून आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

उष्मघातापासून स्वत:ला वाचविणे खूप गरजेचे झाले आहे. आपली एखादी लहानशी चूक महागात पडू शकते. आज आपण उष्मघाताची काही लक्षणे जाणून घेऊया. ही लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. (what are the symptoms of sunstroke)

उष्मघाताची लक्षणे

थकवा येणे, हे उष्मघाताचं प्रथम लक्षण आहे.

ताप येणे

डोके दुखणे

हातापायांना गोळे येणे

चक्कर येणे

रक्तदाब वाढणे

अस्वस्थता वाढणे

बेशुद्ध वाढणे

त्वचा कोरडी पडणे

उष्मघातापासून वाचण्यासाठी हे उपाय करा

उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

उन्हात जास्त वेळ फिरू नये.

जास्त तापामानाच्या खोलीत काम करू नये.

ग्लुकोज लेवेल मेंटेन ठेवावी.

उन्हाळ्यात पातळ, सुती, पांढरे कपडे परिधान करावे.

दिवसातून दोन तीनदा थंड पाण्याने अंघोळ करावी.

उन्हात काम करताना डोक्यावर टोपी, स्कार्फ, कॅपचा वापर करावा.

उन्हातून आल्यानंतर लगेच फ्रिजचे पाणी पिऊ नये. तुम्ही माठातील पाणी पिऊ शकता.

लिंबू पाणी, उसाचा रस, ओआरएस, दही किंवा लस्सी, ताक नियमित प्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *