IPL 2023 : ‘हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा…’ विजयानंतर धोनीने व्यक्त केली भावना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । MS Dhoni Retirement : आयपीएलचा हा सीझन सुरू झाल्यापासून महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबत अटकळ आणि प्रश्न वाढत आहेत. धोनीचा हा शेवटचा सीझन असेल का? अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. त्याचवेळी धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे चाहतेही याबाबत धास्तावले आहेत आणि त्यामुळे ते सर्वत्र मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी पोहोचत आहेत. आता खुद्द धोनीने एका वक्तव्याने या अटकळांना पुन्हा खतपाणी घातले आहे.

चेपॉक स्टेडियमवरील शुक्रवारची रात्र चेन्नई सुपर किंग्जसाठी चांगली गेली. अखेर संघाने सनरायझर्स हैदराबादचा सहज पराभव केला. रवींद्र जडेजाची उत्कृष्ट गोलंदाजी आणि डेव्हॉन कॉनवेची दमदार खेळी याशिवाय एमएस धोनीचा झेल, स्टंपिंग आणि विकेटमागे धावचीत हेदेखील यामागे मोठे कारण होते.


सामना संपल्यानंतर धोनीने हर्षा भोगले यांच्याशी मजेदार संवादात वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. यापैकी धोनीने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागले. चेन्नईतील प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाने खूश झालेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले की, दोन वर्षांनंतर येथील प्रेक्षकांना सामना पाहण्याची संधी मिळाली असून त्यांच्यासमोर खेळणे विशेष आहे.

धोनी पुढे म्हणाला, दुसरं काय सांगू. आता मी सर्व काही सांगितले आहे. हा माझ्या करिअरचा शेवटचा टप्पा आहे. येथे खेळणे छान आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे. फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही, पण तक्रार नाही. येथे मला प्रथम क्षेत्ररक्षण करताना संकोच वाटत होता, कारण मला वाटले की तेथे जास्त दव पडणार नाही. आमच्या फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *