Weather : देशातील विविध राज्यात अवकाळी पाऊस, आजही पावसाचा अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा तडाका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे.अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे.


हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही देशातील विविध राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान, मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब-हरियाणा, छत्तीसगड या राज्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. आजही देशातील काही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.तापमानात दोन ते तीन अंशाची घट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.उत्तर प्रदेश, पंजाब-हरियाणा, उत्तराखंड या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळं तापमानात घसरण झाली असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. आजपासून हवामानात बदल दिसून येत आहे. येत्या 24 तासांत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव संपेल.अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.आज उत्तर प्रदेश, पंजाब-हरियाणा, उत्तराखंड या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *