देशाचे आता ‘६ जी’ च्या दिशेने पाऊल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । २०२३ च्या अखेरपर्यंत देशात ६ जी नेटवर्क लाँच करण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे. सन २००० च्या सुमारास तिसरी पिढी म्हणजेच ३ जी मोबाईल तंत्रज्ञान सुरू झाले. २०१० पर्यंत ते तंत्रज्ञान स्थिरावले होते, त्याचा वेग २ mbps पर्यंत होता. त्याचवेळी ४ जी वरही काम सुरू झाले होते. २०१८ नंतर, ४ जी आपल्या आयुष्यात प्रवेश करू लागला. हे ३ जी पेक्षा जवळपास १०० पट वेगवान नेटवर्क आहे. त्यानंतर ५जीचे युग देखील आले आणि ते ४ जी पेक्षा १०० पट वेगवान आहे. यामुळे होणारे बदल समजेपर्यंत आता ६ जी ची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच सरकारकडून सांगण्यात आले की, २०२३ पर्यंत देशात ६ जी नेटवर्क सुरू केले जाऊ शकते. आपल्या आयुष्यात ६जी चा प्रवेश २०३० पर्यंत होईल, असा अंदाज आहे.

वास्तविक, ५जी च्या जमान्यात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच Al चा देखील व्यवहार करत आहोत. एआय चॅटबॉट चॅटजीपीटीचे नाव तुम्ही ऐकले असेलच. आजकाल ते चर्चेत आहे. चॅटजीपीटी सर्वात कठीण प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे. अशाप्रकारे चॅटजीपीटी गुगलसाठीही कसा धोका ठरत आहे, हे पाहिले जात आहे. ५जी च्या युगातच, आपण Metaverse चा देखील सामना करणार आहोत. ५जी च्या जमान्यात संपूर्ण जग मोबाईल फोनच्या आत गुंतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *