महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । Gold : साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे. अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदीचा उत्साह असतो. अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला सोनं आणि चांदी काहीसं स्वस्त झालंय. त्यामुळे आज सोनेखरेदी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास ३ हजार कोटींच्या घरात उलाढाल होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अक्षय्य तृतीयेपासून अनेकजण आंबा खाण्यास सुरूवात करतात त्यामुळे आंबा खरेदीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाहन खरेदी, घर खरेदीसाठीही आजचा मुहुर्त साधला जाईल. आजच्या दिवशी लग्नही मोठ्या प्रमाणात होतात.