महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी अजित पवारांनी शुक्रवारी केलेल्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी नाव नघेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले की, अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता आहे, ते अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, अनेक वर्ष मंत्री आहेत, तसेच चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे अनेकांना वाटत असतं मुख्यमंत्री व्हावं” एकनाथ शिंदे यांचं नाव नघेता म्हणाले की, अनेक जण लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, तोड फोड करून.
जर एखाद्याच्या भाग्यात योग असेल तर होत असत, अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची अनेक वेळा इच्छा बोलून दाखवली. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर संजय राऊतांनी दिली.
अजित पवार काय म्हणाले होते.
सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखती दरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आलं की, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती. तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असंही ते म्हणाले.
अजित पवार यांनी दोन मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता २०२४ ला मुख्यमंत्रीपदावर तुम्ही क्लेम करणार का, असा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, क्लेम २०२४ ला का? आताच करणार, अस म्हणून अजित पवारांनी सूचक विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकली होता.