चीनमधील सर्कशीतला एक व्हिडीओ; सर्कस सुरु असतानाच सिंह पिंजऱ्यातून पळाले….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । Viral Video: सर्कशीत प्राण्यांचा सहभाग करत त्यांचा एखाद्या वस्तूप्रमाणे वापर करण्याला प्राणीप्रेमींनी नेहमीच विरोध केला आहे. प्राण्यांविरोधात होणारे हे अत्याचार रोखले जावेत यासाठी जगभरात अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली आहेत. काही देशांमध्ये आता हे प्रकार थांबले आहेत. मात्र अद्यापही काही देश सर्कशीत प्राण्यांचा वापर करत त्यांचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहेत. दरम्यान, चीनमधील सर्कशीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत सिंह (Lion) सर्कस सुरु असतानाच पिंजऱ्यातून पळ काढताना दिसत आहे. सिंहांच्या करामती पाहून मनोरंजन करुन घेणारे प्रेक्षक यानंतर मात्र जीव मुठीत घेऊन धावताना दिसत आहेत.

हेनान प्रतांतील लुओयांग शहरात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सिंह प्रेक्षकांपासून दूर उभारण्यात आलेल्या लोखंडी पिंजऱ्यातून बाहेर पळताना दिसत आहेत. सिंहाना सूचना देणारे दोन कलाकार यावेळी सिंहाना काठीच्या सहाय्याने सूचना कऱण्याचा प्रयत्न करत होते. पण सिंग पिंजऱ्याभोवती फिरत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *