Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस असा असेल हवामान अंदाज, वादळी वाऱ्यासह गारपीट - Maharashtra 24

महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस असा असेल हवामान अंदाज, वादळी वाऱ्यासह गारपीट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात (temperature) सातत्याने वाढ होत आहे. विविध शहरांतील कमाल तापमान चाळीसच्या पुढे गेले असले तरी आज राज्याचे कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत मध्ये आहे. त्यातच आता पुढील पाच दिवसात पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातही वाशिम आणि बुलढाण्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस (Heavy rain with hail) सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पदरी पुन्हा निराशाच पडणार आहे…

आज राज्यातील विविध शहरांमध्ये कमालीचे तापमान असताना राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 39.4 अंश सेल्सिअस एवढी झाली. परिणामी राज्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामध्ये कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात 24 ते 26 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ किंवा राज्यातील शहरांमध्ये तापमानात कमालीची तफावत जाणवली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *