महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । Clean Teeth Tips : आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेबरोबरच दातांची स्वच्छता तर महत्वाची आहेच पण त्याबरोबरच तुमच्या दातांचा रंगही महत्वाचा ठरतो. हसताना तुमचे दात पिवळे असतील तर पुढल्या व्यक्तीच्या नजरेत तुमचं बॅड इम्प्रेशनसुद्धा पडू शकतं. पिवळे दात होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचे पिवळे दात अगदी झटक्यात पांढरे शुभ्र दिसतील.
रोज सकाळी ब्रश केला म्हणजे दातांचा पिवळेपणा जातो असे काही नाही. दाताचं पिवळेपण घालवण्यासाठी तुम्हाला बेकिंग सोड्याचा वापर करावा लागेल. तुम्हाला त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोड्यात चिमुटभर मिठ टाकायचं आहे. तसेच बोटांच्या मदतीने त्याला दातांवर घासा. दोन ते तीन वेळा हे करा. त्यानंतर तुमच्या दातांचा रंग तुम्ही बदललेला बघाल. तुमचे दात अगदी पांढरे शुभ्र दिसतील.
हेल्थ एक्सपर्टच्या मते ज्यास्त कोल्ड ड्रिंक पिल्यानेसुद्धा दात पिवळे होतात. त्यामुळे कोल्ड ड्रिंक, सोडा, चहा, रेड वाइन यांसारख्या पेयांपासून दूर राहावे. यामुळे जर तुमच्या दातांना पिवळेपणा आला असेल तर आल्याची पेस्ट बनवा आणि त्याला तुमच्या टूटपेस्टमध्ये मिक्स करून घ्या. याने तुमचा ब्रिदिंग स्मेल दूर होईलच सोबतच तुमचे दात पांढरे शुभ्र होतील. (Adverse Effect On Teeth)
आयुर्वेदात तुळशीची पानं ही फार गुणकारी असल्याचे सांगितल्या गेलेय. तुलशी आणि कडूनिंबाची पेस्ट दातांचा पिवळेपणा दूर करते. आणि दातांना मजबूत बनवते. तुम्हाला पेस्टमध्ये तुळशी आणि निंबाची पेस्ट मिक्स करून त्यांने ब्रश करायचा आहे. त्यामुळे तुमचे दात मजबूत होतील आणि दातांचा पिवळेपणाही जाईल. (Lifestyle)