महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ३० एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असतानाच या परीक्षेचे प्रवेशपत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता आयोगाने सायबर पोलिसांत तक्रार केली आहेत.
जा.क्र.01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ची प्रवेशप्रमाणपत्रे टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध असल्याबाबत तसेच सदर चॅनेलकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांबाबतचा खुलासा प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. pic.twitter.com/UP9hnZgUGB
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) April 23, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’, ‘क’च्या परीक्षाचे हॉल तिकीट हॅक (Hall Ticket Hack) करण्यात आले आहे. त्यामुळे लाखो विध्यार्थ्यांची माहिती हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 90 हजारांपेक्षा जास्त विध्यार्थ्यांचे हॉल तिकिट हॅक झाले आहे. एका टेलिग्राम चॅनलवर या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपलोड करण्यात आले आहेत. या परीक्षेचा पेपर देखील आपल्याकडे असल्याचा दावा त्यात करण्यात आला आहे.
एका टेलिग्राम चॅनलवर 30 एप्रिलला होणार्या परीक्षेचा डाटा लीक झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याअनुषंगाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यातील वस्तुस्थिती पडताळणी केली जाईल. पेपर लीक होत नसतात, ते खोटे आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी सांगितलं आहे.