![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । अलिकडे प्रत्येकाच्या घरात अनेक उपकरणं असता. टीव्ही, फ्रिज, पंखे, लाईट, वॉशिग मशिन यांसारख्या उपकरणांचा नियमित वापर केल्याने दर महिन्याला येणारं तगडं वीज बिल पाहून महिन्याअखेरीस भुवया उंचावतात. या वीज बिलामुले Electricity Bill अनेकदा संपूर्ण महिन्याचं गणितचं बिघडतं. त्यात उन्हाळ्यात ACचा वापर वाढला की बिलाचे आकडे चक्रावणारे असतात. Save Electricity Bill with affordable gadgets
अनेकदा वीज बिल जास्त येईल या चिंतेत एसी Air Conditioner आणि अनेक उपकरणांचा वापर आपण सांभाळून करतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यातही मग फक्त काही तास AC लावून समाधान मानावं लागतं. मात्र आता तुम्हाला या वाढत्या वीज बिलाची Electricity Bill चिंता करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला काही असे डिव्हाइस Device सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं बिल निम्म कमी होऊ शकतं. खास करून उन्हाळ्यात Summer या डिव्हाइसचा उपयोग जास्त फायदेशीर ठरू शकतो.
बाजारात अशी काही डिव्हाइस उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही वीज बिलात कपात करू शकता. अगदी कमी खर्चिक असणारे हे डिव्हाइस एकदा खरेदी केले की तुमची वर्षभराची चिंता मिटणार आहे आणि अर्थात खास करून उन्हाळ्याची. या डिव्हाइसमुळे जर तुम्हाला ५ ते ६ हजार रुपये लाइट बिल येत असेल तर ते केवळ १ ते २ हजार इतकं येइल. म्हणजेच निम्मं किंवा त्याहून कमी बिल तुम्हाला येईल. हे डिव्हाइस कोणती ते पाहुयात.
स्मार्ट प्लग्स- स्मार्ट प्लग हे तुमच्या अगदी सहजपणे घरातील विद्युत उपकरणं ऑन किंवा ऑप करण्यास मदत करतात. तुम्ही स्मार्ट फोन किंवा इतर स्मार्ट डिव्हाइसच्या मदतीने तुम्ही उपकरणं चालू बंद करू शकता. शिवाय तुम्ही टायमर लावून ते चालू बंद करू शकता. यामुळे विजेची बचत करणं शक्य होईल. कारण यामुळे तुम्ही वापरत नसेलेली उपकरणं चालू बंद करणं सहज शक्य होईल.
पाॅवर कट स्विच- पावर कट स्विच वापरून तुम्ही विजेची बचत करू शकता. जेव्हा तुम्ही पावरकट स्विचच्या मदतीने वीज बंद करता तेव्हा डिव्हाइसमध्ये साचलेल्या विजेचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे ऊर्जा वाचते.
स्मार्ट थर्मोस्टेट- स्मार्ट थर्मोस्टेट विजेच्या बचतीसाठी खूप उपयोगी ठरतात. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरुन ही उपकरणं नियंत्रित करू शकतात. तसचं तुम्ही घरातील तापमान देखील सहज नियंत्रित ठेऊ शकता. थर्मोस्टेटचा वापर एअर कंडिशनरसाठी देखील केला जातो.
सोलर पॅनल- सोलर पॅनल सौर उर्जेला उर्जेमध्ये रुपांतरीत करण्याचं काम करतात. ते वीजेसोबत ग्रिड-ऑफ करू शकतात. त्यामुळे विजेची बचत होण्यास मदत होईल. सौर उर्जेवर तुम्ही घरातील अनेक उपकरणं वापरू शकता. त्यामुळे तुमच्या वीज बिलात मोठी घट होईल.
एनर्जी सेव्हिंग लाइट- अलिकडे बाजारामध्ये अनेक चांगल्या ब्रॅण्डचे असे एनर्जी सेव्हिंग लाइट्स उपलब्ध आहेत. यात कमी प्रमाणात विजेचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला कमी वीज बिल येण्यास मदत होईल.
स्मार्ट मीटर- स्मार्ट मीटरचा वापर घरातील विजेचा वापर समजून घेण्यासाठी केला जातो. या मीटरमध्ये एक चीप असते जी तुमचा विजेचा वापर ओळखते त्यामुळे तुम्हाला तुमचा वीज वापर ओळखून वीज बिल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
स्मार्ट अॅप्स- काही स्मार्ट अप्स अशी असतात ज्यामुले तुम्हाला वीज बिल कमी करण्यास मदत होवू शकते. या अॅप्सच्या मदतीने तुम्ही घरातील उपकरणं नियंत्रित करु शकता म्हणजेच ती ऑन किंवा ऑफ करू शकता. यामुळे विजेचा गैरवापर कमी होवून वीज बिल कमी येऊ शकते.