Death Threat: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात लखनऊच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊ पोलिसांनी योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठार करण्याची धमकी आली होती. त्यापाठोपाठ आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भातले वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाकडुन ११२ हा नंबर मदतीसाठी जारी केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाता व्यक्तीने फोन केला होता. त्यावर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लवकरच ठार करणार असल्याचं व्यक्तीने म्हंटलं आहे.

ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कलम ५०६, कलम ५०७ आणि आयटी अॅक्ट कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *