महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । आपल्या सर्वांनाच रोजचा इंटरनेट डेटा (Internet Data) हा लागतोच लागतो. त्याशिवाय ना आपली कामं पुर्ण होतात ना आपला दिवस! त्यातून ‘एअरटेल’ आणि ‘जिओ’चे सर्वाधिक ग्राहक भारतात आहेत. परंतु जेव्हा या डेटा प्लानच्या किमती वाढतात तेव्हा मात्र आपल्या नाकीनऊ येतात. सध्या ग्राहकांना चिंतेत टाकणारी बातमी समोर येते आहे. आता 5G चीही सेवा उपलब्ध होते आहे. ‘एअरटेल’ आणि ‘जिओ’च्या रिचार्जच्या किमती या वाढवणार असून आता हे पॅक महागणार असल्याची बातमी समोर येते आहे.
भारतात ‘रिलायन्स जिओ’ आणि ‘भारती एअरटेल’नं आपली 5G सेवा (5G Services) सुरू केली आहे. तेव्हा आता हे रिचार्ज प्लॅन्स (Recharge Plans Price Chart) महाग होण्याचीही शक्यता आहे. रिपोट्सनुसार, या दोघांच्या रिचार्ज प्लॅन्समध्ये 10 टक्क्यांची वाढ होऊ शकते. म्हणजेच 300 रूपयांच्या प्री-पेड प्लॅनची किंमत 320 होण्याची शक्यता आहे. हजार रूपयांचे प्लॅन्सही महाग होण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या डिसेंबर – जानेवारीच्या तिमाहीत हे प्लॅन्स महागडे होण्याची शक्यता आहे.
महागणार डेटा?
‘रिलायन्स जिओ’नं आपलं 5G चं मार्केटिंगही सर्वत्र वाढवलं आहे. शहरी भागांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत या कंपनी वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा आता यादरम्यान या दोन कंपन्या आपले रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढविण्याच्या मार्गावर आहेत. सध्या याबद्दल विविध अपडेट्स येत आहेत. या प्लॅन्समध्ये 10 टक्क्यांची वाढ होणार असून 200 रूपयांचा प्लॅन हा 220 रूपयांना मिळणार आहे व 1000 रूपयांचा प्लॅन हा 1100 रूपयांना मिळणार आहे.
सध्या या प्लॅन्समुळे ग्राहकांना चांगला फायदा होतो आहे. त्यांना हायस्पीड आणि अनलिमिटेड डेटा मिळतो आहे. त्यामुळे हे प्लॅन्स जर का महागले तर ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर उमटू शकेल. व्होडाफोन आयडिया या कंपनीनं आपल्या किमती अद्याप वाढविल्या नसल्या तरी आपले दरही ही कंपनी वाढविण्याची शक्यता आहे.
वोडफोन आयडिया, एअरटेल आणि जिओमध्ये आरोप-प्रत्यारोप?
प्रतिस्पर्धी कंपनीनं किंमती चुकीच्या पद्धतीनं लावला असल्याचा आरोप केला आहे. VI नं TRAI ला एक पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. त्यात म्हटलंय की, जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी उत्तर द्यावे. हे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सनं प्रसिद्ध केलं आहे. एअरटेल आणि जिओचा दावा आहे की त्यांची फाईव्ह जी सेवा मोफत नसून ग्राहकांना 5G वापरण्यासाठी 4G चा प्लॅन रिचार्ज करावा लागतो आहे.