महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । बॉलिवूड अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय न्यायालयाने निकाल दिला. सबळ पुराव्याअभावी अभिनेता सूरज पांचोली याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एएस सय्यद यांनी हा निकाल दिला आहे. (Jiah Khan Death Case) न्यायाधिशांनी तक्रारदार राबिया खान यांच्या वकिलाला सांगितले की तिला या निकालाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. या खटल्यात सरकारी पक्षाने २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. जियाने तिच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी पांचोलीचे घर सोडल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. पांचोलीने चौकशीदरम्यान काही माहिती लपवल्याचा दावा सीबीआयने केला होता.
काय घडलं होतं नेमकं?
जिया खान ही बॉलिवूड अभिनेत्री ३ जून २०१३ रोजी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिने जीवन संपवल्यानंतर अभिनेत्रीच्या घरातून एक सहा पानी पत्र सापडले. हे पत्र जिया खान खानच्या अक्षरात होते. या पत्रात, जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली याच्यावर अभिनेत्रीला जीवन संपविण्यासाठी प्रवृत्त (Jiah Khan Case) केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावर विशेष सीबीआय न्यायालय आज (दि. २८ एप्रिल) सुनावणी घेण्यात आली. यावर न्यायालयाने
Actor Sooraj Pancholi acquitted of abetment charges in Jiah Khan suicide case pic.twitter.com/SUM97xLqeP
— ANI (@ANI) April 28, 2023
या प्रकरणी २० एप्रिल रोजी विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत पुढील सुनावणीपर्यंत निर्णय राखून ठेवला होता. आज सकाळी १०:३० वाजता या प्रकरणावर विशेष सीबीआय (Jiah Khan Case) न्यायालयाने सुनावणी घेतली. त्यामुळे जिया खानला तब्बल १० वर्षांनंतर आजच्या अंतिम निकालानंतर न्याय मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांनी जिया खानच्या मृत्यूनंतर सूरज पांचोली याच्यावर आरोप केले होते. त्यानंतर, सूरज पांचोलीला १० जून २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान दोन आठवड्यांहून अधिक काळ त्याला कोठडीत ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. जुलै २०१४ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे गेले. यानंतर गेल्या वर्षी या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारी जियाच्या आईची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.