महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २८ एप्रिल । पावसाळ्यात शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा इमारती, घरे, बंगले तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत. अन्यथा महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.
पावसाळ्यात जुन्या व धोकादायक इमारती, घरे व बंगले कोसळतात. त्यामुळे इमारत किंवा घरमालकाने अशा धोकादायक इमारतींची तात्काळ दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 265 अन्वये प्रत्येक इमारत मालकांची ती जबाबदारी आहे.
अशा जुन्या व धोकादायक इमारती व घरांची तात्काळ तपासणी करून घ्यावी. त्यानुसार दुरुस्ती काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. अशा धोकादायक इमारतीमध्ये राहू नये. दुरुस्ती न केल्यास महापालिकेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. इमारत किंवा त्याचा काही भाग कोसळल्यास त्याची माहिती महापालिकेच्या 27425511 किंवा 6733333333 या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.