महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही कानाकोपऱ्यात राहा पण तुम्हाला हे 6 उद्योग चांगलीच कमाई करून देतील. महाराष्ट्रातील मेट्रो सीटीमध्ये अनेक वेगवेगळ्या भागातून लोक नोकरीच्या शोधात येतात.त्यामुळेच महाराष्ट्रात संस्कृती, वस्तू, खाद्यपदार्थ एवढंच नाही तर कपड्यांमध्ये सुद्धा वैविध्य आढळलं, महाराष्ट्रात सर्वात जास्त चालणारे व्यवसाय कोणते आहेत ते जाणून घेऊया. तुम्ही जर व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे फायद्याचं.
कपड्यांचा व्यवसाय : महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक राहतात. इथे पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही संस्कृती एकत्र पाहायला मिळते. याशिवाय पडदे, उश्यांची कव्हरं, बेडशिट या गोष्टीही मोठ्या प्रमाणात इथेच लोक घेतात. इथले लोक चांगलं राहण्यावर जास्त भर देतात. त्यामुळे कपडे, घरातील वस्तू खरेदीकडे कल अधिक असतो.
तुम्ही टेक्सटाईलमध्ये होलसेल, रिटेल किंवा वेस्टर्न कपड्यांचं दुकान, ट्रेडिशनल कपड्यांचं दुकान सुरू करू शकता. सोलापूर, मालेगाव, उल्हासनगर, भिवंडीत मोठ्या प्रमाणात टेक्सटाईलचे कारखाने आहेत. इथून तुम्ही थेट माल घेऊन विकू शकता.
ऑरगॅनिक फ्रूट आणि व्हेजिटेबल – धकाधकीच्या आयुष्यात चांगल्या आरोग्याकडे लक्ष दिलं जात आहे. रसायन मिसळलेलं खाण्यापेक्षा ऑरगॅनिकवर जास्त भर दिला जात आहे. अशावेळी तुम्ही शेतकऱ्याकडून थेट शेतमाल घेऊन दुकान चालू करू शकता किंवा ऑनलाईन विकू शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल.
महाराष्ट्रातील लोक खाण्याचे शौकिन तर आहेतच पण कामामुळे काहीवेळा घरी नाश्ता जेवण करण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जेवण, स्ट्रिट फूड किंवा एखादा खास खाद्यपदार्थ खिशाला परवडेल अशा किंमतीमध्ये सुरू करू शकता.
महाराष्ट्राला सुंदर सह्याद्रीचा कडा, समुद्र किनारा आणि पठार लाभलं आहे. एवढंच नाही तर इथे खास मंदिरं देखील आहेत. त्यामुळे तुम्ही इथे महाराष्ट्रात टुरिझमचा व्यवसाय करू शकता. तुम्हाला त्याचा फायदा होईल.
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आता इमारती, रस्ते बांधकाम आणि घर, गाळे यांचं काम चालू आहे. याशिवाय जमिनीची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी तुम्ही रिअल इस्टेट एजन्ट म्हणून काम करू शकता. तुम्हाला त्या भागातील माहिती असणं आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे लायसन असणंही आवश्यक आहे.
अजूनही महाराष्ट्रात बरेच जण आहेत जे ऑनलाईन ऐवजी दुकानात जाऊन वस्तू घेण्यावर जास्त भर देतात. त्यामुळे तुम्ही किराणा दुकान सुरू करू शकता. कुठल्याही गल्लीत किंवा वस्तीत तुम्ही किराणा दुकान सुरू केलं तरी तुमची चांगली कमाई होईल.