महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । सोने-चांदीच्या घौडदौडीला सराफा बाजारातच नाही तर वायदे बाजारातही ब्रेक लागला आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेचा परिणाम या दोन्ही धातूंच्या किंमतींवर दिसून येत आहे. हे दोन्ही धातू दबावाखाली आल्याने त्यामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. वायदे बाजारात सोने 61,371 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. पण व्याजदर वाढीच्या चर्चांमुळे भाव एक हजार रुपयांनी घसरले. जूनच्या वायदे करारासाठी हा भाव आता 59,945 रुपये प्रति 10 ग्रॅम ठेवण्यात आला आहे. सराफा बाजारात तर 19 एप्रिलनंतर सोने-चांदीची (Gold Silver Price ) घौडदौड थंडावली आहे.
आज काय भाव
गुडरिटर्न्सनुसार, 29 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 55,900 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 60,970 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या भावात जवळपास 200 रुपयांची घसरण झाली आहे. 19 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने प्रति तोळा 56,200 रुपये होते. तर 24 कॅरेटचा भाव 61,310 रुपये प्रति तोळा आहे. आयबीजेए, शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी भाव जाहीर करत नाही.