“महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीला व पाठपुराव्याला यश”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड – विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – “महात्मा ज्योतीबा फुले” या नावाऐवजी ” महात्मा जोतीराव फुले ” हेच नाव अधिकृत पणे वापरावे. असा ठराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व साधारण सभेत दि. 01.06.2020 रोजी मंजूर करण्यात आला आहे.

महात्मा जोतीराव फुले हेच नाव अधिकृत असावे, या मागणीचा आपण महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने, गेल्या १ वर्षांपासून पाठपुरावा केला. यासाठी महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, सर्व पक्षाचे नेते, तसेच इतर संबंधित समित्यांचे पदाधिकारी यांना संघटनेच्या वतीने निवेदने दिली, या विषयांसंबंधित कागदपत्रांच्या आधारे सर्वांना हा विषय समाजावून सांगून चर्चा केल्या, वेळोवेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटून या मागणीचा पाठपुरावा केला.
“हा ऐतिहासिक निर्णय व विजय आम्ही ” महात्मा जोतीराव फुलेंच्या चरणी अर्पण करतो”.
तसेच, या लढाईत आमचे प्रेरणास्रोत माननीय कॅबिनेट मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. छगनरावजी भुजबळ साहेब, आणि सामाजिक विचारवंत आमचेु रू प्रा. हरी नरके सर हे आहेत.*
आपल्याला या ऐतिहासिक यशात मदत करणारे सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व समता सैनिकांचे, फुले प्रेमींचे , तसेच मोलाचे सहकार्य करणारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माननीय आयुक्त साहेब, माननीय महापौर साहेब, माननीय सभापती- स्थायी समिती, सर्व राजकीय पक्षांचे नेते, सर्व सन्माननीय नगरसदस्य या सर्वांचे आम्ही अखील भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपरी चिंचवड शहर जिल्हा च्या वतीने मनापासून आभार व धन्यवाद!……….अध्यक्ष:- अॅड. चंद्रशेखर भाऊ भुजबळ, सचीव:श्री. राजेंद्र भाऊ करपे ,उपाध्यक्ष:-श्री. ज्ञानेश्वर माऊली मोंढे व श्री. पी.के. महाजन साहेब. तसेच समस्त कार्य कारीणी सदस्य ऑफ ” अखील भारतीय समता परिषद पिंपरी चिंचवड शहर … धन्यवाद .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *