नांदेड ; कामचुकारपणा करणाऱ्या पल्लवी इंटरप्राजेस वर स्वछता निरीक्षकांनी केला गुन्हा दाखल.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नांदेड – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – सध्या देशात राज्यात कोविड-19चा शिरकाव फार मोठया प्रमाणात होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने या व्हायरसचा शिरकाव रोखण्या साठीचे निर्देश सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांना दिला होता.नांदेड जिल्हाधिकारी मा.विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील सर्व स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्थाना या व्हयरसचा शिरकाव रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे सूचित केले होते. त्यास लागणाऱ्या निधीचीही व्यवस्था मा.पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी प्रशासकीय यंत्रणेला कोणत्याच पद्धतीची हयगय खपऊन घेतली जाणार नसल्याचे बजावून सांगण्यात आले होते.तश्या पद्धतीचे पालन जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी केले असून ही या कोविड-19व्हायरस ची जिल्ह्यात रोख थांब करण्यासाठी जिल्ह्याचे शिलेदार अहोरात्र झटत असताना,

हिमायतनगर पंचायत येथे कमी वेळेत जास्त पैसे चुकीच्या पद्धतीने कमवण्याच्या कोणत्याही मार्गाचा अवलंब करून हिमायतनगर पंचायत येथे घनकचरा व्यवस्थापणाचे काम पाहाण्या साठी “पल्लवी इंटरप्रायजेस”या संस्थेस हिमायतनगर पंचायत हद्दीत शहरातील नाली, रस्ते, व इतर कामे करण्यासाठी चालू वर्षाचे कामाचा ठेका देण्यात आला आहे.या मालकाने शहरात सुरवातीचे काही दिवस कोणचीच तक्रार न येऊ देता काम करून अधिकाऱ्यांची मने जिंकली म्हणून मी काही केले तर कोण विचारणार या अतिशयोक्तीने शहरातील परमेश्वर मंदिर परिसरात बस स्थानक परिसरातील मुख्य मार्गांवर प्रशासनाच्या वतीने शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी देण्यात आलेल्या सोडियम हायपोक्लोराइट औषधाचा वापर करणे अपेक्षित असताना या गुतेदारांच्या माणसानी त्या फवारणीत सोडियम हायपोक्लोराइट चे मिश्रण योग्य प्रमाणात पाण्यात टाकून परिसर निर्जंतुकीकरण करावयास पाहिजे होते पण काही जागरूक नागरिकांनी भा.ज.पा.युवा मोर्च्यातालुकाध्यक्ष रामभाऊ सुरवंशी. व भा.ज.पाचे तालुकाध्यक्ष अशिष सकवान यांनी कोरोना च्या काळात शहर सॅनिटाझर करण्याच्या नावाखाली होत असलेल्या निव्वळ पाण्याच्या फवारणीचा जनतेसामोर भाडाफोड करून याप्रकरणी सखोल चोकशी करण्याचे निवेदन हिमायतनगर तहसिलदार नगरपंचायतचे मुख्यधीकारी व जिल्हाअधिकारी नांदेड यांना केला.

सदर प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी नगरपंचायतच्या सहाय्यक अधीक्षिका मुक्ता कांदे व रत्नाकर डावरे यांनी मोक्यावर जाऊन पंचासमक्ष व त्या परिसरातील नागरिकांन समोर त्या फवारणी यंत्रातुन दोन बाटली भरून त्या बाटल्या न्यायिक पडताळणी करण्यासाठी वैज्ञानिका कडे पाठवून अहवाल सादर करण्याचे सुचवण्यात आले होते.पण न्यायिक पडताळणीत त्या फवारणी यंत्रतुन तपासणी साठी घेण्यात आलेल्या बाटलीत कोणत्याच प्रकारचे सोडियम हायपोक्लोराइट ची मात्रा नसल्याचा अहवाल दिला असल्यामुळे हिमायतनगर पंचायतचे स्वच्छता निरीक्षक रमाकांत बाचे यांनी पल्लवी इंटरप्रायजेस चे मालक किशन विठ्ठल वनांळे रा.शिवाजीनगर इतवारा नांदेड यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे तक्रार नोंदवली असून त्यानुसार हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये सदरील इसमावर 420, 188, 269, 270, 271, भा.द.वी.व सह कलम महाराष्ट्र आपत्ती कायदा 2005चे कलम 53, 56, अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *