महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । पहिली इलेक्ट्रिक शिवनेरी एसटी बस सोमवारी पुणे ते ठाणे मार्गावर धावली. स्वारगेट ते ठाणे एसटी स्टँड या मार्गावर एसटी प्रशासनाकडून या गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. बदलत्या काळानुसार एसटी आता आपले रूप बदलायला सुरुवात करत आहे. एसटीच्या ताफ्यात नुकत्याच इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच नवीन लालपरी आणि हिरकणी बस सुद्धा दाखल होत आहेत.
त्यातच आता नव्या इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुद्धा एसटी प्रशासनाने घेतले असून त्या सुद्धा प्रवाशांना सेवा पुरवणार आहेत. त्यातील इलेक्ट्रिक शिवनेरी बस काही दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाल्या होत्या. त्यातील पहिली बस सोमवार (दि. 01) रोजी स्वारगेट ते ठाणे या मार्गावर धावली आहे. यावेळी एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांच्यासह एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.