शरद पवारांची मोठी घोषणा; राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी केली. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझा सांगती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही घोषणा केली.

यापुढे मी तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असंही शरद पवार म्हणाले.

यावेळी सभागृहातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात शरद पवार यांच्या घोषणा सुरू होत्या. यावळी बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *