मे महिन्यात विवाहासाठी २० मुहूर्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात मागील दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी लग्न समारंभ थांबले होते, मात्र यंदाच्या एप्रिल व मे महिन्यात ठाणे जिल्हा सह मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व शहरी तसेच आदिवासी भागात विवाह सोहळ्याची मोठी लगबग सुरू आहे. आतापर्यंत मार्च व एप्रिल दरम्यान ७० ते ८० लग्नाचा बार उडला आहे. परंतु मे महिन्यात जवळपास २० मुहूर्त असल्याची माहिती मुरबाड प्रसिद्ध गुरुजी रविंद्र खरे यांनी दिली आहे.

मे महिना सुध्दा लग्नसराचा हा महिना असल्यामुळे वाजंत्री, कॅटर्स, स्वयंपाकी, यांना जरी सुगीचे दिवस असले तरी तेही वेळेवर मिळेना, अशी परिस्थिती ग्रामीण व शहरी भागात झाल्याचे बोलले जात आहे. सगळीकडेच विवाहाचे मुहूर्त सारखेच असताना आणि त्यात उष्णतेची आलेली लाट अशा स्थितीत या विवाह सोहळ्यांना हजेरी लावताना वधु-वर तसेच वऱ्हाडी मंडळी उष्णतेशी सामना करावा लागणार आहे.

मे महिन्यात अतिशय ऊन कडक जाणारा असल्याने उष्णतेच्या तडाखा असला तरीही लग्नसराई जोरात धुमधडाका अशा पद्धतीचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. जरी महागाईचा भडका उडाला असला तरी मुरबाड सारख्या ग्रामीण भागातील सरळगाव, टोकावडे, म्हसा धसई, शिवळे तसेच मुरबाड शहर या प्रमुख बाजारपेठेमध्ये लग्नसरासाठी किराणा दुकान, कपड्याचा दुकान तसेच ज्वेलर्समध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे माहिती व्यापारी वर्गाने दिली आहे. मे महिन्यात २० मुहूर्त असले तरी त्यात मुहूर्तांच्या तारीख ठराविक असल्याने या एकच मुहुर्तावर विवाह सोहळ्यांचे बार उडणार आहेत. मात्र यंदाचा उन्हाळा प्रखर असल्याने वऱ्हाडी मंडळींना लग्नसमारंभात जाणे म्हणजे प्रखर उष्म्याचा सामना करीत जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *