निगडी येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रास शिवसेना कार्यकर्ते स्व. प्रवीण खिलारे यांचे नाव द्यावे

Spread the love

सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची महापालिका आयुक्तांना निवदेनाद्वारे मागणी…

पिंपरीः महाराष्ट्र 24।

निगडी, यमुनानगर येथील सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारत बांधकाम पूर्ण झालेले आहे. ही इमारत ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र म्हणून उभारण्यात आली आहे. या विरंगुळा केंद्रास शिवसेना कार्यकर्ते स्व. प्रविण काशिनाथ खिलारे यांचे नाव देऊन लवकरात लवकर हे विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे इमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.

सदर निवेदनामध्ये काळभोर यांनी म्हटले आहे की, या विरंगुळा केंद्रास शिवसेना कार्यकर्ते स्व. प्रविण काशिनाथ खिलारे यांचे नाव देण्यासंधर्भात फ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सभेमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव यमुनानगर स्कीम नंबर २१ येथील चारही नगरसेवकांनी मंजुर केला होता. मात्र कालांतराने एका नगरसेविकेने खिलारे यांच्या नावाला विरोध दर्शवून या ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रास दुसऱ्या व्यक्तीचे नाव देण्याची महापालिकेकडे मागणी केली. त्यामुळे या विरंगुळा केंद्राचे लोकार्पण लांबणीवर गेले आहे. सदर विरंगुळा केंद्रास शिवसेना कार्यकर्ते स्व. प्रविण काशिनाथ खिलारे यांचे नाव देण्याची मागणी निगडीवासीयांकडून जोर धरू लागली आहे.

स्व. प्रविण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे ह्यांचे नाव सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारत बांधकाम ठिकाणी देण्यात यावे. फ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सभेमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारत बांधकाम या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नाव देण्यात यावे म्हणून सभेमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता ४ नगरसेवक व नगरसेविकांनी सही देखील केली होती. मात्र पुन्हा सुमन पवळे यांनी सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारत बांधकाम ह्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीची नावे सद्गुरू दत्त उद्यान इमारत येथील बांधकामास देण्यात यावी, अशी मागणी फ क्षेत्रिय अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे निगडी येथील यमुनानगर स्कीम नंबर २१ येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठी खुले करण्यास विलंब होत गेला.

विशेष बाब म्हणजे फ क्षेत्रिय अधिकारी सिताराम भवरे हे राजकीय नेते मंडळींच्या दबावाखाली निर्णय घेतं नाहीत. राजकीय दबावामुळेच भवरे हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप निगडी येथील नागरिकांकडून होत आहे.

इमारत बांधकाम संपूर्ण होऊन एक ते दीड वर्ष झाले असून फक्त विरोधाला विरोध धोरण ठेवून नागरिकांना वैठीस धरणे सुरू असून लवकरात लवकर शिवसेना कार्यकर्ते स्व. प्रविण काशिनाथ खिलारे व सिताराम धोंडू रहाटे यांचे नाव सद्गुरू दत्त उद्यान येथील इमारत प्रकरणी देण्यात यावे. तसेच सद्गुरू दत्त उद्यान येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नागरिकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात यावे ही नम्र विनंती.
– सचिन काळभोर,
सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर

सदर इमारत उद्यान विभाग अधिकाऱ्यांनी फ क्षेत्रिय कार्यालयाकडे अद्याप ताब्यात दिली नाही. त्यामुळे या इमारतीचे लोकार्पण करणे तसेच ज्येष्ठांना उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरत आहे.
– सिताराम भवरे, फ क्षेत्रिय अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *