सामन्याच्या तोंडावर वेस्ट इंडिजचा ‘बिग हिटर’ फलंदाज केकेआर च्या ताफ्यात दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ मे । मुंबई इंडियन्सने बुधवार पंजाब किंग्जला पराभूत केले आणि गुणतालिकेत चांगलीच रंगत आणली. आता गुणतालिकेत गुजरातचा संघ १२ गुणांवर, त्याखाली २ संघ ११ गुणांवर आणि त्या खालोखाल ४ संघ १० गुणांवर विराजमान आहेत. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. सनरायजर्स हैदराबाद विरोधात त्यांचा आजचा सामना रंगणार आहे. त्याआधी त्यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या उर्वरित हंगामासाठी यष्टीरक्षक-फलंदाज लिटन दासने माघार घेतली होती. त्याच्या जागी ‘वेस्ट इंडिज’चा बिग हिटर फलंदाज जॉन्सन चार्ल्स याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

कौटुंबिक कारणांमुळे लिटन दास गेल्या आठवड्यात बांगलादेशला परतला. 28 वर्षीय खेळाडूला केकेआरने गेल्या वर्षी त्याच्या मूळ किंमत 50 लाख रुपये देऊन खरेदी केले होते. केकेआरने त्याला केवळ एका सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले आणि नंतर त्याला वगळले. त्याच्या जागी आता जॉन्सन चार्ल्स हा वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज संघात आला आहे. त्याने आतापर्यंत 41 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 971 धावा केल्या आहेत. त्याने एकूण 224 टी-20 सामने खेळले आहेत ज्यात त्याच्या नावावर 5600 पेक्षा जास्त धावा आहेत. त्याच्या मूळ किमतीच्या ५० लाख रुपये तो KKR मध्ये सामील होईल. चार्ल्स देखील संघात ५० लाखांच्या मूळ किमतीवरच दाखल झाला आहे

लखनौ विरुद्ध चेन्नई सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले गेले. गुजरात टायटन्स १२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर लखनौ व चेन्नई हे संघ प्रत्येकी ११ गुणांवर आहेत. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे प्रत्येकी १० गुणांवर होते, काल मुंबईचा संघही विजयासह तालिकेत १० गुणांवर आला. पाठोपाठ कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी ६ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीत या तीन संघांसमोर विजय मिळवणे हा एकच पर्याय आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *