समोर आली प्रभासच्या आदिपुरुषची रिलीज डेट, या तारखेला रिलीज होणार ट्रेलर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ मे । अभिनेता प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत आदिपुरुष सर्वात वरचा आहे. नुकतेच या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. आता या चित्रपटाची रिलीज डेट आणि ट्रेलर लॉन्च डेटही समोर आली आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासशिवाय क्रिती सेनॉन, सनी सिंग आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिपुरुषचा ट्रेलर 9 मे रोजी रिलीज होणार आहे. ट्रेलर रिलीजसाठी मुंबईत खास कार्यक्रम होणार आहे. ट्रेलर लॉन्चची जोरदार तयारी सुरू आहे. ट्रेलर सुमारे 3 मिनिटांचा असेल. मात्र, याबाबत अद्याप चित्रपट निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. हा चित्रपट 16 जून रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपट पुढे ढकलला जाऊ शकतो अशी बातमी आली होती. आदिपुरुष रिलीज होण्याआधी 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्येही तो दाखवला जाणार आहे.

प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची गेल्या 2 वर्षांपासून चर्चा आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता, ज्याने चांगलाच गोंधळ निर्माण केला होता. टीझरमध्ये सैफच्या रावणाच्या लूकची खिलजीशी तुलना करण्यात आली होती. त्याचवेळी हनुमानाच्या रूपावरून वाद झाला होता. आदिपुरुषच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टर्सवरून बराच वाद झाला होता.

साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या चाहत्यांना या चित्रपटाचे वेड लागले आहे. या चित्रपटात प्रभास रामची भूमिका साकारत आहे, तर क्रिती सेनन सती मातेची तर सनी सिंग लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *