पुणे ; हॉर्मोन्स आणि आयुर्योग चिकित्सा एकदिवसीय कार्यशाळा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ मे । आयुर्योग ही संकल्पना नवीन समजल्या जाणाऱ्या व्याधी ज्यामधे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिक हेतू मुळे घडणाऱ्या संप्राप्ती ला समजून आयुर्वेद आणि योग याच्या सामंजस्याने विचार करण्यासाठी मांडली जात आहे.

सध्याचा आणि येणारा काळ हा वैद्य वर्गासाठी व्याधी आणि हेतुसंकर याचा अभ्यास आणि चिकित्सेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे. आपल्या आहार ,विहार, आचार , विचार इत्यादीचे अत्यंत वेगाने होणारे पास्च्यातिकरनामुळे बरेच प्रश्न चिकित्सा करताना निर्माण होतात आणि त्याची उकल ही अत्यंत युक्तीने करणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने काही अर्वाचीन भाषेमध्ये प्रचलित असणाऱ्या व्याधिंची आयुर्वेदीय दृष्टिकोनातून विचार आणि चिकित्सा तत्व निश्चित करण्याच्या दृष्टीने एक वैद्य समूह निर्माण करण्याचा मानस या कार्यशाळेच्या द्वारे करत आहोत.

या कार्यशाळेमध्ये वैद्य दिलीप गाडगीळ, वैद्य सुष्मिता त्रिलोक धोपेश्वरकर मुख्य मार्गदर्शन करणार आहेत.                                      वैद्य निसार शेख योगचिकित्सा या विषयी मत मांडतील.

हा विषय केवळ वैद्य च नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असून कॅन्सर, मधुमेह, Autoimmune Conditions, हॉर्मोन्स ची अनियमितता, तणावामुळे होणारे शारीरिक व्याधी आणि अश्या बऱ्याच गोष्टींसाठी खूपच उपयुक्त ठरू शकेल.
सर्वांनी या कार्यशाळेमध्ये भाग घ्यावा.

दिवस : रविवार
दिनांक :14/5/2023
वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 5
स्थळ: हॉटेल प्रेसिडेंट
कर्वे रोड, गरवारे कॉलेज समोर
देणगी शुल्क : १५००/- रुपये

(नाश्ता, दुपारचे भोजन, सायंकाळचा चहा / कॉफी , नोटपॅड, पेन वगैरे सह)

नोंदणीसाठी संपर्क :
वैद्य निसार शेख 09960074283
वैद्य सोनाली गटलेवार
099750 41085

शुल्क जमा केल्यावर पावती वरील नंबर वर नाव, पत्ता, email address, फोन नंबर सह पाठवणे
त्यानंतर मुख्य ग्रुप वर add करून पुढील माहिती दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *