बँकेतील कामं आज रखडणार ; 2 दिवस बंद राहणार बँका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । तुम्ही जर आज बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे आज काही शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमचं काम होऊ शकणार नाही. तुम्हाला रिकाम्या हातांनी माघारी यावं लागू शकतं. त्यामुळे बँकेत जाण्याआधी बँक सुरू आहे की नाही ते तपासून पाहा. RBI ने याबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

5 मे 2023 आज बुद्ध पौर्णिमा आहे, त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी तुमच्या शहरातील बँकांची स्थिती काय आहे ते आधी चेक करा. याशिवाय लाँग विकेण्डमुळे ATM मध्येही खडखडाट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आवश्यक असतील तर ते आजच ATM मधून काढून घ्या.

आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, आज आगरतळा, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला आणि श्रीनगरमधील बँकांना आज सुट्टी असणार आहे. 6 मे रोजी शनिवार आणि 7 मे रोजी रविवार असल्याने तुमची महत्त्वाची कामं अडकण्याची शक्यता आहे.

8 मे रोजी सोमवारी तुम्ही बँकेतील कामं पूर्ण करू शकता. नियमित वेळेत बँका सुरू राहणार असल्याचं RBI ने आपल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. तर ऑनलाईन सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही बरीच कामं ऑनलाईन बँकेच्या साईटवर जाऊन नेट बँकिंगद्वारे करू शकता.

7 मे 2023 रविवार देशभरातील बँका बंद

9 मे 2023 रवींद्रनाथ टागोर जयंती कोलकाता

13 मे 2023 दुसऱ्या शनिवारी देशभरातील बँका बंद आहेत

14 मे 2023 रविवार देशभरातील बँका बंद

16 मे २०२३ राज्य दिन गंगटोक

20 मे 2023 चौथा शनिवार बँक देशभरात बंद

21 मे 2023 रविवार देशभरातील बँका बंद

22 मे 2023 महाराणा प्रताप जयंती शिमला

28 मे 2023 रविवार बँक देशभरात बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *