धोका कायम ! महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्यावर पोहोचली; एका दिवसांत 2436 नवे रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – राज्यात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2436 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 हजारांच्यावर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी 1475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण (Recovery Rate) 43.81 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे. आतापर्यंत 35156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईत सर्वाधिक- 54, ठाणे- 30, कल्याण-डोंबिवली- 7, वसई-विरार आणि भिंवडी येथे प्रत्येकी एक, जळगाव जिल्ह्यात 14, मालेगाव-8, नाशिक- 2, पुणे,- 14, सोलापूर-2, रत्नागिरी-5, औरंगाबाद- 1 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्र्यांनी दिलेली माहिती अशी की, सध्या राज्यात 545947 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72375 खाटा उपलब्ध असून सध्या 30291 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ज्या भागात रुग्णांचे क्वस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसा क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3474 झोन क्रियाशील असून एकूण 18026 सर्वेक्षण पथकांनी कानम केले असून त्यांनी 69.18 लाख लोकसंख्येचं सर्वेक्षण केल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, पुणे विभागातील 6 हजार 486 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 हजार 438 झाली आहे. तर अक्टिव्ह रुग्ण 4 हजार 428 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 258 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 8 हजार 916 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 5 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अक्टिव्ह रुग्ण संख्या 3 हजार 111 आहे. कोरोनाबाधित एकूण 393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *