Wtc Final 2023 | केएल राहुल याच्या जागी या खेळाडूला संधी, बीसीसीआयची मोठा घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने मांडीच्या दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर पडलेल्या केएल राहुल याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. तसेच 3 राखीव खेळाडूंची नावंही जाहीर केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. केएल राहुल याला 1 मे रोजी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. त्यामुळे केएलला आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधून बाहेर व्हावं लागलं.

महामुकाबला केव्हा?
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हा महामुकाबला होणार आहे. या महामुकाबल्याचं आयोजन इंग्लंडमधील द ओव्हरमध्ये करण्यात आलं आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर पावसामुळे काही गडबड झाल्यास सामन्यात व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने खबरदारी घेतली आहे. आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे.

WTC Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *