RTE Admission : आरटीई प्रवेशाची मुदत पुन्हा वाढविली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । नाशिक ; RTE Admission : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत प्रवेशप्रक्रियेत शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी दिलेली ८ मे ची मुदत पुन्हा वाढविण्यात आली आहे.१५ मेपर्यंत पालकांना कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (deadline for RTE admission been extended again nashik news)


नाशिकमधील ४०१ शाळांत प्रवेशासाठी चार हजार ८५४ जागा उपलब्ध असून, त्यासाठी तब्बल २२ हजार १२२ अर्जांची नोंदणी झाली आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर राज्यस्तरावर ५ एप्रिलला सोडतप्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये चार हजार ७५० बालकांची निवड झाली. १३ एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवडयादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला. बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे.

मात्र, आरटीई पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे अलॉटमेंट लेटर आणि हमीपत्र डाउनलोड करण्यास अडचण येत आहे. काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने पोर्टलवर खात्री करण्यासही तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.२४ एप्रिलला विभागाने प्रवेशासाठी असलेली ८ मेपर्यंत मुदत वाढविली होती. मात्र, प्रवेशास येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.प्रलंबित असलेल्या प्रवेशाबाबतच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी घेऊन पालकांनी बालकांचे प्रवेश घ्यावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *