वेबसाइट, ओपन स्कूल व बनावट विद्यापीठ स्थापन करून इम्रानने 50 ते 60 हजारांत वाटल्या बोगस पदव्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । दहावीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा सूत्रधार सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (३८) याने ‘अल हिंद’ हे बनावट विद्यापीठ स्थापन करून बीए, बी.कॉम. पदव्यांसह आयटीआयची बोगस प्रमाणपत्रेही सर्रास वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. तो ५० ते ६० हजारांत पदव्या विकायचा. छत्रपती संभाजीनगरातून इम्रान गेली ४ वर्षे बोगस पदव्यांची खैरात करत होता. त्यासाठी त्याने बेकायदा वेबसाइटही तयार केली होती.

हैदराबाद येथील एका विद्यापीठातून एमबीए-आयटी पदवीधर इम्रानच्या लॅपटॉप-मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. पदवी घेतल्यानंतर कुुटंबीयांसह इम्रान छत्रपती संभाजीनगरातच रोशन गेट परिसरात वास्तव्य करून होता. महाराष्ट्रात १७ क्रमांकाच्या फाॅर्म अाधारे दहावीची परीक्षा देता येते. त्यामुळे मुक्त शाळा व्यवस्था उपलब्ध नव्हती, परंतु केंद्राच्या २०१२ च्या अध्यादेशानुसार देशातील सर्व राज्यांत मुक्त शाळा असावी, असे धाेरण अाखले. त्यानुसार महाराष्ट्रात डिसेंबर २०१८ मध्ये मुक्त शाळांना परवानगी मिळाली. २०१९ मध्ये ‘महाराष्ट्र स्टेट अाेपन बाेर्ड स्कूल’ची (एमएसअाेबीएस) स्थापना झाली. शैक्षणिक जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात आली. या धोरणाचा गैरफायदा घेत इम्रानने २०१९ पासून ‘महाराष्ट्र स्टेट अाेपन स्कूल’ (एमएसअाेएस) असे नावात बदल करून स्वत:ची बेकायदा वेबसाइट सुरू केली. या अाेपन स्कूलला फी अाकारण्याचा किंवा परीक्षा घेण्याचा अधिकार नसताे, परंतु इम्रानने स्वयंसेवी संस्थांची मान्यता घेत परस्पर विद्यार्थ्यांना फी अाकारण्यासाेबत परीक्षा घेण्याचे अाश्वासन देत प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले.

मुक्त विद्यापीठ सुरू करण्यासाठी थेट मंत्रालयापर्यंत केला अर्ज
इम्रान याने सन २०१७ मध्ये ‘अायटीअाय’ शाखेची बनावट शासकीय वेबसाइट बनवली. त्याअाधारे अायटीअाय उत्तीर्णची डिप्लाेमा प्रमाणपत्रे पैसे देऊन पदवी देणे सुरू केले. त्यानंतर ‘अल हिंद विद्यापीठ’ ही अस्तित्वात नसलेली विद्यापीठ वेबसाइट तयार करून त्याद्वारे परीक्षा न देताच विविध अभ्यासक्रमांच्या पदव्यांचे वाटप सुरू केले. ‘एमएसअाेएस’ संस्थेला मुक्त विद्यापीठाचा दर्जा मिळावा याकरिता इम्रानने मंत्रालयातही अर्ज सादर केला. तसेच गैरव्यवहारातून पैसा जमा करून पुढील दाेन वर्षांत संभाजीनगर येथे त्यास जमीन घेऊन स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करावयाची हाेती.

प्रमाणपत्रे वाटप केलेल्या व्यक्तींचा शोध सुरू : गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असून आरोपी सय्यद इम्रानने अनेक बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्याचे वाटप विविध ठिकाणी केले आहे. त्या अनुषंगाने पोलिस संबंधित गुन्ह्यातील आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. त्याचसोबत बनावट प्रमाणपत्रांचे वाटप नेमके कुणाकुणाला करण्यात आले आहे, त्यांचाही शोध सुरू असल्याचे पुणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

३५ बनावट प्रमाणपत्रे ताब्यात
अाराेपीच्या ताब्यातून ३५ बनावट प्रमाणपत्रे ताब्यात घेण्यात अाली असून अागामी काळात ही संख्या माेठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली अाहे. दरम्यान, इम्रानच्या पाेलिस काेठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात अाली अाहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर हे करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *