महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । Maharashtra Heat Wave: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात वातावरणात सातत्यानं बदल होत आहेत. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे.महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक आता हैराण होऊ लागले आहेत. मे महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने झाली होती. यामुळे मे महिना असूनही उन्हाळा जाणवत नव्हता. परंतु पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील पाच दिवस उन्हाची तीव्रता वाढणार आहे.
14 मे पर्यंत पुण्यात (Pune) उष्णता वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तवला आहे. शहरातील तापमान 40 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि गोव्यात हवामान कोरडे राहणार आहे.
विदर्भातील तापमान 45 पार जाण्याची शक्यता
विदर्भात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते. त्यामुळं आता तापमान 45 अंशावर जाण्याचा इशारा हवामान खात्यानं व्यक्त केलाय. यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यात विदर्भाचं तापमान 43 अंशावर गेलं होतं. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापणार असा अंदाज होता. मात्र अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस (Rain) सुरू झाला. (Pune News)
जवळपास 15 दिवस सलग पाऊस पडला. यादरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. यामुळे विदर्भात 43 अंशावर गेलेलं तापमान 35 अंशावर खाली आलं आणि हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुले काही दिवस उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता. (Temperature Update)
मात्र, आता पावसाळी वातावरण निवळलंय, त्यामुळं पुन्हा उन्हाचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत विदर्भातील तापमान 45 अंशावर जाईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.