Alphanso Mango | फक्त कोकणच नाही तर ; आता ‘या’ ठिकाणी चाखता येणार हापूस आंब्याची चव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ मे । हापूस आंबा (Alphanso Mango) म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं, कोकणामध्ये पिकणारा हा हापूस (Hapus Mango) आंबा दरवर्षी सातासमुद्रापलीकडे जातो. परंतु विदर्भातील क्वचितच लोकांनी या आंब्याची चव चाखलेली असेल. हिच बाब हेरून बुलढाणा अर्बनने गेल्या सतरा वर्षापासून बुलढाणा अर्बन कन्झुमर शॉपमध्ये बुलढाणा अर्बन बँकेच्या सभासदासाठी तसेच बुलढाणावासियांसाठी खास कोकणातून आणलेला हापूस आंबा “ना नफा, ना तोटा” या तत्वावर विक्रीसाठी ठेवायला सुरुवात केली आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बुलढाणा अर्बनच्या कन्झुमर शॉपमध्ये हापूस आंबा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यावर्षी गारपीटमुळे हापूस आंब्याचे मोठ्याप्रमांवर नुकसान झालेले आहे. उत्पादन कमी असून देखील बुलढाणा अर्बनने थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन हा आंबा खरेदी करून आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बुलढाणा अर्बनच्या “ना नफा, ना तोटा” या उपक्रमामुळे किमान बुलढाणावासियांना नैसर्गिकरित्या पिकलेल्या अस्सल हापूस आंब्याची चव चाखायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *