Poco F5 5G आज भारतात लाँच होणार, किंमत आणि फीचर्स काय असतील? जाणून घ्या

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ मे । भारतात एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन आहेत. असं असलं तरी कायमच नव्या स्मार्टफोनबाबत उत्सुकता असते. नव्या फोनमधील फीचर्स, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशनबाबत कुतुहूल असतं. अशीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पोको एफ5 5जी स्मार्टफोनबाबत आहे. हा स्मार्टफोन आज (9 मे 2023 ) संध्याकाळी भारतात लाँच होणार आहे. हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येणार असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. कंपनीने या स्मार्टफोनबाबत काही माहिती ट्वीट करून जाहीर केली आहे.


हा पहिला ग्लोबल फोन आहे की, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7+ Gen 2 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन गेम खेळणाऱ्या युजर्ससाठी जबरदस्त आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी इतर काही गोष्टी यामुळे आणखी बेस्ट मिळतील असा दावा आहे.

Poco F5 5G स्मार्टफोनची किंमत किती असेल?
पोको F5 5G स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांच्या आत असू शकते. लीक्सनुसार या स्मार्टफोनच्या बेस मॉडेलची किंमत 28 हजार ते 29 हजार रुपयांच्या दरम्यान असेल, असा दावा करण्यात आला आहे. पोको F4 हा स्मार्टफोन 30 हजारांच्या असल्याने असा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे हा स्मार्टफोन ग्राहकांना 11 मे पासून खरेदीसाठी उपलब्ध असू शकतो. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या स्मार्टफोनची नोंदणी करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *