Water Supply : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आता दर गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून (गुरुवार ता. १८) होणार आहे. आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. दरम्यान, ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्यास महापालिकेने दहा टक्के पाणीकपात आणि पाणी जपून वापरण्याबाबत जलसंपदा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने पुढील काळातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा समितीची बैठक झाली होती.

सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ‘एअर व्हॉल्व्ह’

पावसकर म्हणाले, ‘‘जलवाहिन्यांत ‘एअर ब्लॉक’ येत असल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित होतो. ही अडचण दूर करण्यासाठी ‘एअर व्हॉल्व्ह’ बसवून तो सुरळीत करता येऊ शकतो, असे निदर्शनास आले आहे.

एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या भागातील पाणीपुरवठा विस्कळित होतो, अशी वीस ठिकाणे महापालिकेने निश्‍चित केली आहेत. त्या ठिकाणी ‘एअर वॉल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे तो पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत होईल. तसेच या भागात पर्यायी व्यवस्था म्हणून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *