Maharashtra Political Crisis: .निकालाआधीच अजित पवार यांनी एक मोठं विधान , म्हणाले ……

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । Ajit Pawar Big Statement: राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आजच लागणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरणार आहे. मात्र, निकालाआधीच अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. (Breaking Marathi News)

जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडे आहे. तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही असे मोठं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. मे महिन्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागणार अशी चर्चा होती. आज त्यासंदर्भआत निकाल लागणार आहे. निकाल काहीही लागला तर माझे स्वतःचे मत आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) सर्वोच्च आहे असे अजित पवार म्हणाले.

माझे याबाबत काही अभ्यासकांशी बोलणं झालं आहे. आजच्या घडीला १४५ पेक्षा जास्त बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकशाहीमध्ये असलेल्या अधिकाराचा ते वापर करत आहेत. जोपर्यंत १४५ चा आकडा त्यांच्याकडे आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नसल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *