महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – नांदेड: संजीवकुमार गायकवाड – लॉकडाऊनच्या काळात सक्तीच्या विश्रांतीचा सदुपयोग व्हावा या दृष्टीने धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी त्यांच्या शाळेच्या विद्यानिकेतनीय या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सतत 19 दिवस दररोज वेगवेगळे ऑनलाइन गेम घेवून एक नवीन पायंडा पाडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद या नावाजलेल्या शाळेत ठाकूर यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप असून त्यामध्ये अनेक उच्च पदावरील प्रशासकीय अधिकारी, कॅप्टन, डॉक्टर इंजिनिअर, प्राध्यापक,वकील, पत्रकार यांच्या सहित अनेक नामांकित माजी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 14 मे ते 1 जून या कालावधीत दररोज सायंकाळी पाच ते सहा यादरम्यान दिलीप ठाकूर यांनी ऑनलाइन गेम घेतले.त्यामध्ये सदाबहार नगमे ,ग्रुप का सुपरफास्ट मेंबर,अरे दिवानो मुझे पहचानो,जीपीएस आयडॉल,क्विझ मास्टर,यह ग्रुप फिल्मी है,कौन कितने पानी में,पझल गेम,केबीसी,उत्कृष्ट वक्ता,देख तमाशा कार्टून का,गीत रामायण,स्पोर्ट्स क्विझ,बेस्ट इंटरटेनर,पहचान कौन, डोळे हे फिल्मी गडे,पहेली सुलझावो,इमोजी मास्टर,समाज सुधारक के अनुयायी या विविध विषयांवरील खेळांचा समावेश होता.त्यामध्ये शहारुख वरनाळे यांनी तब्बल 7 गेम मध्ये विजेतेपद तर एकदा उपविजेते पद पटकावले.
प्रा.भानुदास बिराजदार यांना तीन वेळेस तर प्रा. बब्रुवान मोरे यांना दोनदाविजय मिळाला.कॅप्टन निळकंठ केसरी हे दोन वेळा विजयी व चार वेळा उपविजेते ठरले.राहुल भोसले यांनी एकदा विजेते तर चार वेळेस उपविजेते पदाचा मान मिळविला.प्रमोद दहिभाते यांची दोनदा,सुदर्शन….यांची एकदा विजेते पदासाठी निवड करण्यात आली.सुहास वाघ हे एकदा विजेते तर दोनदा उपविजेते ठरले.या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गीत-रामायण या स्पर्धेत सर्व सहभागी स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला.याशिवाय प्रवीण बिरादार, रामलाल पवार,एन. जी. मामोडे सर,चांद सय्यद,रामदास शिंदे,हरिभाऊ चौरे ,नितीन जाधव , लक्ष्मण नितनवरे ,भास्कर हिप्परगे यांनी एकदा दुसरा क्रमांक पटकावला.यशस्वी स्पर्धकांना लगेच ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण करण्यात येत होते. ऑनलाइन गेम बाबत अनेकांनी दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले.
कॅप्टन नीलकंठ केसरी यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की, वेळातवेळ काढून आदरणीय दिलीपभाऊ ठाकूर यांनी केलेली ही एक अप्रतिम आणि उच्च दर्जाची समाजसेवाच आहे.अशा खेळांची, प्रश्नमंजूषेची सवय मुलांना, तरूणांना लागावी,त्यांच्या मेंदूला व्यायाम घडावा, बुध्दीला चालना मिळावी अपेक्षा व्यक्त केली.एन. जी.मामोडे सर यांनी असे सांगितले की, या खेळाने विद्यानिकेतनीय ऋणानुबंध आणखी घट्ट केले . ज्येष्ठ आणि कनिष्ठ यांची सुंदर सरमिसळ केली . अनेकांना मरगळ झटकायला भाग पाडले . हास्य -विनोदाने ताण-तणाव दूर केले .
प्रा. डॉ. बब्रुवान मोरे यांनी असे नमूद केले की,वेगवेगळे एकोणीस गेम सातत्याने घेणे भगीरथ कार्य आहे.
ऑनलाइन गेम मध्ये वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून प्रचंड रंगत निर्माण केली. या गेममुळे सर्व सीनियर व ज्युनियर मित्रांचे हितगूज वाढले. सर्व लहान-मोठ्या मित्रांनी आपले पद प्रतिष्ठा बाजूला ठेवून स्पर्धेचा निखळ आनंद लुटला. ऋणानुबंधांचे व दृढ बंधुभावाचे नाते निर्माण केले.विजय गुरखेल यांनी म्हटले की, ठाकूर या जादूगाराने ग्रुपमध्ये नुसते चैतन्यच आणले नाही .तर विसरत चाललेल्या स्पर्धा करण्याच्या बालमनाला जागृत केलं.काळानुसार हरवत चाललेल्या हजरजवाबी पणाला परत आणलं.प्रत्येकातील कलागुणांना ओढून बाहेर आणलं. फार दशका पासुनच्या ते आताच्या दशका पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांना एका भावनिक माळेत गुंफले.
ऍड. अनिल कांकरिया यांनी अशी कॉमेंट केली की,रात्री दहा वाजता ग्रुप उघडून पाहिले तर साधारणतः आठशे, हजार पोस्ट आलेल्या असायच्या. त्या पाहताना आपणही खेळत रंगून गेलो असा भास होत होता.खेळणा-यांनी प्रत्यक्ष मजा घेतली तरी न खेळणा-यांनी जर ते व्यवस्थित वाचले असेल तर त्यांचेही सामान्य ज्ञानाची उजळणी झालेली असेल अशी माझी खात्री आहे.भारत तांबोळकर यांनी सांगितले की,दिलीपभाऊं कुशल संघटक आहेत हे त्रिवार सत्य आह.या स्पर्धा कुठल्याही टप्प्यावर कंटाळवाणी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.25 ते 65 वयोगटातील सर्व स्पर्धकांना एकाच वयात आणून ठेवले.
रामदास भोयर यांनी असे मत व्यक्त केले की,आम्ही
लाॅकडाउनच्या काळात सेवेत व कार्यक्रम चालू असताना बस मध्ये असायचो खुपच जीव खाली वर होत होता. संगळ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी खुपच धावपळ होत होती.दिलीपभाऊंच्या गेम मुळे सगळे सिनियर ज्युनियर एकत्र आले हा खुपच प्रेरणादायी उपक्रम होता.
सर्वात जास्त विजेतेपद पटकवणाऱ्या शाहरूख वरनाळे यांनी आभार व्यक्त करतांना असे सांगितले की,ऑनलाईन गेम हा एक अप्रतिम उपक्रम मी माझ्या आता पर्यंतच्या सहभाग घेतलेल्या आणि पाहिलेल्या खेळातील सर्वोत्तम उपक्रम.
लहान मोठे सर्व त्याच उत्साहाने खेळले.
लॉकडाऊन चा पूर्ण दिवसभराचा ताण या एक तासाच्या खेळा मध्ये कधी निघून गेला समजलेच नाही .