खाजगी रुग्णालयांनी कोरोना पेशंट साठी सर्व सामान्य माणसाला परवडेल असे दर ठरवुन सहकार्य ची भुमीका बजवावी:- जेष्ठ कर सल्लागार पी. के. महाजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन- विशेष प्रतिनिधी – पी.के.महाजन – पिंपरी चिंचवड -: कोरोना व्हायरस च्या महाभयंकर संकटात खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडुन होणारी पैशांची भरमसाठ लुट थांबली पाहीजे. कोरोना बाधीत रुग्णांकडुन खाजगी रुग्णालयात भरमसाठ चार्जेस लावून जी आर्थीक लुट केली जात आहे ती थांबवण्यासाठी नाशिक म.न.पा. चे आयुक्त मा.श्री. राधाकृष्ण गमे यांनी या लुटी वर चाप लावला आहे.नाशिक मनपा. हद्दीतील रूग्णालयांना त्यांच्या गुणवत्ते नुसार ” कोरोना बाधीत रुग्णांसाठी ” जास्तीत जास्त किती चार्जेस लावावेत असे दर ठरवुन दिले आहेत.

व त्या दरांचे फलक रुग्णालयाच्या च्या दर्शनी भागात लावायला सुचना दिल्या आहेत जेणे करून रुग्णाला अॅडमीट होण्या अगोदर त्याला लागणारया बिलाच्या रक्कमेचा अंदाज येईल व ती रक्कम ते व त्यांचे नातेवाईक गोळा करू शकतील , त्या पेक्षा जास्त चार्जेस लावले त व सदर रुग्णांने तशी लेखी तक्रार आयुक्तांकडे केली तर आयुक्त त्या रुग्णालयाला ते ज्यादा घेतलेले पैसे परत करण्यास भाग पाडतात. कोरोना Covied 19 च्या साथी मूळे सर्व सामान्य माणूस घाबरलेला आहे, आपलयाला कोरोना झालाय तर काय करायचं? सरकारी रुग्णालय हाऊस फुल झालेले दिसतात.

खाजगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ पैसे लागतात असे दिसते. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. अडकीत्यात सापडल्या सारखी गत झाली अशी भिती वाटते…..अशा परिस्थितीत नाशिकच्या आयुक्तांनी घेतलेला निर्णय संकटात आधार देणारा वाटतोय….म्हणुन ह्याच धरतीवर पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तां सहीत सर्वच महानगरपालिकेच्या आयुक्तांनी निर्णय घ्यायला पाहिजेत…..जेणेकरून जनतेची पैशां ची लुट होणारं नाही. आणि दर ठरवुन दिले तर खाजगी रुग्णालयांना व पेशंटला हि अडचणी येणार नाहीत. या बाबतीत खाजगी रुग्णालय प्रशासना ने ही सहकार्याची भूमिका बजवावी अशी अपेक्षा आहे…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *