महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । Copper Utensils Using Benefits : प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी साठवू नये किंवा साठवलेले पाणी पिऊ नये. प्लास्टिकमधील रसायने आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात. त्याऐवजी तांब्याच्या भांड्याचा पाणी पिण्यासाठी वापर करावा.
प्लास्टिकमध्ये पॅथेलेटस नावाचे रसायन असते त्यामुळे यकृताचा कर्करोग आणि शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. फ्रेडोनिया येथील स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कने नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे आढळले की, बाटलीबंद पाण्यात, मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण जास्त असते. अनेक घरांमध्ये फ्रीजमध्ये प्लास्टिकच्या बाटलीत पाणी ठेवले जाते. यातील डीपीए आणि अन्य केमिकल्स शरीरात जातात. त्यापेक्षा तुम्ही तांब्याच्या भांड्यांचा वापर करा. पूर्वी लोक तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा वापर करायचे. आर्यर्वेदानुसार, तांबे हे शरीरासाठी अतिशय पोषक असते. त्यामुळे लोकांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलेच पाणी प्यावे. मात्र तांब्याचे भांडे फ्रीजमध्ये ठेऊ नये.
प्लास्टिकमध्ये असलेले केमिकल्स केवळ पाणी दूषित करत नाहीत तर ते आरोग्यासही हानिकारक आहे. या व्यतिरिक्त, प्लास्टिक फ्लोराइड, आर्सेनिक आणि अॅल्युमिनियमसारखे पदार्थही बाहेर सोडते. हे पदार्थ शरीरासाठी विषारी असतात. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी स्लो पॉइझन आहे. प्लास्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते. उन्हात ठेवलेल्या प्लास्टिक बाटलीतील पाणी प्यायल्यास शरीराला घातक ठरू शकते. कारण सूर्यकिरणांमुळे बीपीए रसायन पाण्यात तातडीने मिसळले जाते. त्यामुळे पाण्याची प्लास्टिक बाटली वापरणार असाल, तर ती सावलीत ठेवावी.