पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांब रांगा, पाहा ग्राउंड रिपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । तुम्ही विकेण्डचा प्लान करत असाल आणि तुम्ही बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई पुणे मार्गाने प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या अचानकपणे वाढल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाहनांची रांग किती लांबच्यालांब आहे, हे स्पष्ट होतं. आता ही वाहतूक कोंडी फोडण्याचं आव्हान महामार्ग वाहतूक पोलिसांसमोर आहे. यासाठी पोलिसांना बोरघाटात तैनात करण्यात येत आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा ट्रकचा ब्रेकफेल झाल्यानं अपघात झाला आहे. बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर उलटला. पहाटे चारच्या सुमारास खोपोली परिसरात हा अपघात झाला.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. 27 एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाल्याने विचित्र अपघात झाला होता.आणि अनेक वाहने एकमेकांना धडकली होती.

पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांकडून ब्लॉक घेतले जात आहेत. दहा-दहा मिनिटांसाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवून, त्या मार्गावरून ही पुण्याकडे येणारी वाहतूक सोडली जात आहे. तर शक्य आहे तिथून जुन्या पुणे-मुंबई मार्गाकडे वाहतूक वळविण्याचे नियोजन आखण्यात आलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *