पुण्यात पोटनिवडणुकीचे वाजणार बिगुल? निवडणूक आयोगाने माहिती मागविल्याने चर्चेला उधाण

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ मे । पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने जिल्हा निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेकडूनही आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाली नसली, तरी ती जाहीर झाल्यास गडबड होऊ नये, यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. परिणामी येथे पोटनिवडणूक लागण्याची शक्‍यता गृहीत धरून ही तयारी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाने यासाठी, महापालिकेत कार्यरत असलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांची माहिती महापालिका प्रशासनाकडून तातडीने मागविली आहे. त्याला उत्तर देताना महापालिकेने १५ राजपत्रित अधिकाऱ्यांची माहिती कळविली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *