Gold Silver Price Today : सोने दर आवाक्या बाहेर ? तर मग चांदीत करा गुंतवणूक ! आजचा भाव घ्या जाणून

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मे । सोन्यापेक्षा चांदीने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. गेल्या तीन दिवसांत चांदीत मोठी तूट आली. सोन्याचा भाव झरझर उतरला. 12 मे रोजी संध्याकाळच्या सत्रात सोन्यात मोठी घसरण नोंदविण्यात आली. प्रति दहा ग्रॅममागे 450 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली. आज सकाळचे भाव अद्याप अपडेट झाले नसले तरी भावात घसरणीचा अंदाज बांधण्यात येत आहे. जागतिक बाजारात डॉलरचा दबाव आणि मंदीची भीतीने हा परिणाम साधला आहे. दुपारनंतर सोने आणि चांदी (Gold Silver Price) कूस बदलतात का याकडे गुंतवणूकदारांसह तज्ज्ञांचे पण लक्ष लागले आहे.

काय होता भाव
गुडरिटर्न्सनुसार, 10 मे रोजी सोन्याने उसळी घेतली होती भाव 250 रुपयांनी वाढले. 11 मे रोजी भावात मोठा उलटफेर झाला नाही. तर 12 मे रोजी संध्याकाळी 22 कॅरेट सोन्यात 450 रुपयांची घसरण झाली. हा भाव 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्यात 440 रुपयांची घसरण झाली. हा भाव 61,840 रुपये झाला.

24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,964 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,720 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,843 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज ibjarates सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केलेला नाही. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,723 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

चांदीत गुंतवणूक फायदेशीर
1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. 11 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये होता. 12 मे रोजी चांदीत 2600 रुपये प्रति किलो घसरण होऊन भाव 75,000 रुपये किलो झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *