सचिन काळभोर यांना पोलिसांनी ताब्यात घेणे हा प्रकार म्हणजे लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा – प्रमोद क्षिरसागर

Spread the love

Loading

पिंपरी-चिंचवड ।
आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. तसेच,आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ४६ वर्षांपासून येथील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळाला नसल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर हे देवेंद्र फडणवीस यांचा लोकशाही मार्गाने सनदशीर निषेध नोंदवणार होते. त्याअनुषंगाने आज सकाळीच निगडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार लोकशाहीची मुस्कटदाबी करणारा आहे. शेतकर्‍यांच्या न्यायिक मागणीचा आवाज बुलंद करणार्‍या कार्यकर्त्याला ताब्यात घेणे हे निश्चितच निषेधार्ह आहे, असे मत व्यक्त करत काळभोर यांच्या निषेध आंदोलनास युथ मुव्हमेंट संघटनेचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर यांनी दिला. तसेच सचिन काळभोर यांना पोलिसांनी लवकरात लवकर सोडवावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे.

सचिन काळभोर हा सच्चा कार्यकर्ता आहे. विशेष म्हणजे सनदशिर मार्गाने, संविधानीक पद्धतीचा अवलंब करून अऩ्यायाविरुद्ध आवाज उठवणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सचिन काळभोर यांच्याकडे पाहिले जाते. पोलिसांनी त्यांची त्वरित सुटका करावी, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेऊ, असा इशारा यूथ मूव्हमेंटचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *