महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मे । केंद्र सरकार याच आठवड्यात ट्रॅकिंग सिस्टिम सुरू करणार आहे. याद्वारे देशभरात लोक आपले हरवलेले, चोरीस गेलेले मोबाइल फोन ब्लॉक करू शकतील किंवा ते शोधू शकतील. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर प्रणाली दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, ईशान्येत पथदर्शी प्रकल्प रूपात होती. ही सुविधा देशभर लागू होईल. तक्रारीसाठी दूरसंचार विभागाच्या https://www.ceir.gov.in संकेतस्थळावर जावे लागेल. पण आधी पोलिसांत तक्रार दाखल करणे अनिवार्य असेल. आतापर्यंत २,४२,९२० मोबाइलला शोधण्यात यश मिळाले आहे.